Monday, January 12, 2026

कर्नाटकातील गोकर्ण आणि जवळचा परिसर पाहू. ३ दिवसांचा प्लॅन.

कर्नाटकात फिरताना कुठल्या ठिकाणी किती वेळ फिरायला द्यावा आणि कोणकोणती ठिकाणी पहावी याबद्दल या आधीच्या काही लेखांमध्ये माहिती दिलेली आहेच. शिवाय माझ्या पेजवर सर्व दक्षिण भारत आणि पर्यटन स्थळे यांची माहिती वेळोवेळी टाकत आलेलो आहे. तुमची यात्रा सुखद होण्याकरिता काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी इथे नेहमीप्रमाणे देत आहे.

आज आपण कर्नाटकातील गोकर्ण आणि जवळचा परिसर पाहू. ३ दिवसांचा प्लॅन.

अरे हो जवळचा परिसर म्हणजे अगदी जवळचा गोकर्णच्या आसपास 30 ते 32 ठिकाणे आहेत जी पाहता येतात. (इथे फक्त मी गोकर्ण हाच भाग घेतो आहे. आणि सिलेक्टेड ठिकाणेच घेत आहे आजूबाजूची ठिकाणे मी गेले वीस वर्षे फिरतोय त्यामुळे व्यवस्थित माहित आहेत) परंतु टप्प्याटप्प्यानं जर ही ठिकाण फिरायची ठरवली तर खूप चांगल्या पद्धतीने कर्नाटकातील सौंदर्य अनुभवता येते. कर्नाटकातील गोकर्ण हे धार्मिक महत्त्व आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा एक अप्रतिम संगम आहे. हे शहर केवळ एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणूनच नाही, तर बीच लव्हर्स आणि ट्रेकर्स साठी देखील स्वर्ग मानले जाते.

• महाबळेश्वर मंदिर - येथे आत्मलिंग असून हे दक्षिण काशी मानले जाते.
• ओम बीच - या बीचचा आकार ॐ सारखा असल्याने हे नाव पडले आहे. वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध. 

• कुडले बीच - शांतता आणि सूर्यास्तासाठी उत्तम. येथे अनेक कॅफे आणि हॉस्टेल्स आहेत. 

• महागणपती मंदिर - महाबळेश्वर दर्शनापूर्वी येथे दर्शन घेण्याची प्रथा आहे.

• हाफ मून बीच - येथे जाण्यासाठी ट्रेकिंग किंवा बोट करावी लागते. खूप शांत बीच आहे. 

• पॅराडाईज बीच - ट्रेकर्सचे आवडते ठिकाण. हे अतिशय दुर्गम आणि सुंदर आहे. 

• कोटी तीर्थ - गोकर्ण मधले एक पवित्र तलाव जेथे भक्त धार्मिक विधी करतात.

तुम्ही गोकर्णला जाणार असाल तर आसपासची ही ठिकाणे नक्की पहा

• मिर्जन किल्ला - हा ऐतिहासिक किल्ला हिरवळीने वेढलेला असून फोटोग्राफीसाठी उत्तम आहे. भुईकोट असल्यामुळे जास्त चालावे लागत नाही वृद्धांना देखील सहज पाहता येतो. 

• याना लेणी - काळ्या चुनखडीच्या भव्य शिळा आणि गुंफांसाठी हे प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी हे उत्तम ठिकाण आहे. अंतर ५० किमी. याना केव्हला पावसाळ्यात जाता येत नाही. फॉरेस्ट एरियात असल्यामुळे दीड दोन किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. आधी मध्ये मधमाशांची पोळी उठतात त्यामुळे फॉरेस्ट वाले बंद करू शकतात.

• विभूती धबधबा- याना लेणी जवळच असलेला हा एक अतिशय स्वच्छ आणि सुंदर धबधबा आहे.

• मुरुडेश्वर - जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी महादेवाची मूर्ती आणि समुद्रकिनारी असलेले मंदिर. इथलं राजा गोपुरम हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे आहे. मुरुडेश्वर वर आपल्याला वॉटर स्पोर्ट अनुभवायला मिळतात. राहण्याकरिता इथे बरेच हॉटेल्स आहेत. अंतर - ८० किमी.

• होन्नावर - येथील 'मॅन्ग्रोव्ह वॉक' आणि बॅकवॉटर बोटिंग खूप लोकप्रिय आहे. कोणावर ला अप्सराकोंड हे अत्यंत सुंदर बीच आहे. इथं शरावती नदी मधल्या बॅक वॉटर ला आपल्याला बोटिंग करता येते. अंतर - ५० किमी. 

सहलीचे नियोजन - 
गोकर्ण फिरण्यासाठी २ ते ३ दिवस पुरेसे आहेत.
दिवस १ 
सकाळी महाबळेश्वर आणि महागणपती मंदिर दर्शन. दुपारी कुडले बीचवर वेळ घालवणे आणि संध्याकाळी तेथील कॅफेमध्ये सूर्यास्त पाहणे.
दिवस २ सकाळी 'बीच ट्रेक' करा (कुडले -> ओम बीच -> हाफ मून -> पॅराडाईज).
संध्याकाळी ओम बीचवर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घ्या.
दिवस ३ सकाळी लवकर याना लेणी आणि विभूती धबधब्यासाठी निघा. परत येताना मिर्जन किल्ला पाहून गोकर्णला परता.

महत्त्वाच्या टिप्स - 
सर्वोत्तम वेळ - ऑक्टोबर ते मार्च. उन्हाळ्यात येथे खूप उष्णता असते.
गोकर्णला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गोकर्ण रोड आहे, पण मोठ्या गाड्यांसाठी अंकोला' किंवा कुमठा जवळ पडते.
यांना रॉक्स ला जाताना काही काळ याना रॉक्स बंद असते. त्यामुळे स्थानिकांना विचारूनच जावे. दोन्हीही बाजूने चालायला लागतेच परंतु कुमठ्याच्या रोडच्या बाजूने गेला तर चालणे कमी होते. यांना रॉक्स जवळ पार्किंगची सोय आहे मात्र जेवण करता हॉटेल्स नाहीयेत. मधमाशांपासून सावध रहा. हा जंगलचा भाग आहे जंगलात कुठेही उतरू नका. यांना रॉक्स च्या जवळच्या ओढ्यामध्ये पिट viper जातीचे प्रचंड विषारी साप आहेत.

प्रवास - स्थानिक फिरण्यासाठी तुम्ही स्कुटी भाड्याने घेऊ शकता (दिवसाला साधारण ₹४००-५००).

#karnataka 
#murudeshwar 
#gokarna 
#udupi 
#yanacaves 
#honnavar

No comments:

Post a Comment

सप्तेश्वर मंदिर – संगमेश्वर रत्नागिरी

  सप्तेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेले एक प्राचीन व श्रद्धास्थान मानले जाणारे शिवमंदिर आहे....